
रशियात लष्करी विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. यात विमानात एकूण सात क्रू मेंबर्स होते. मॉस्कोपासून 321 किमी ईशान्येकडील इवानोवोच्या फुरमानोव्स्की जिल्ह्यात हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथके आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाचे An-22 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. विमानातील क्रू मेंबर्सबाबतही अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
An-22 हे जगातील सर्वात मोठे टर्बोप्रॉप विमान आहे. टर्बोप्रॉप विमान इंधन-कार्यक्षम असून हे विमान 60 टनांपर्यंत माल, 290 सैनिक किंवा 150 पॅराट्रूपर्स वाहून नेऊ शकते. देशांतर्गत उड्डाणे, मालवाहू आणि लष्करी वाहतुकीसाठी हे वापरले जाते.




























































