आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या! प्रदूषणाच्या विरोधात ट्युनिशियाची जनता रस्त्यावर

देशातील वाढत्या प्रदूषणाचा विरोध करण्यासाठी ट्युनिशियाची राजधानी ट्युनिसमध्ये शनिवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले. प्रदूषणाबरोबरच सरकारी मालकीच्या केमिकल कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या हानीकारक कचऱ्याविरुद्धही जनतेने निदर्शने केली. देशाच्या विविध भागांत या आंदोलनाला पाठिंबा मिळाला.

प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार

ऑस्टियोपोरोसिस आणि कर्करोगाचे प्रमाण वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे. सरकारी मालकीच्या फॉस्फेट प्लाण्टमधून निघणारा विषारी वायू ट्युनिशियाच्या राजधानीतील वाढत्या आजारांचे कारण ठरला आहे. शिवाय, हे कारखाने दररोज हजारो टन कचरा समुद्रात टाकतात. कारखान्यांतील विषारी धुरामुळे शाळकरी मुलांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे लोक संतापले आणि सरकारविरोधात रस्त्यावर उतरले