
फिलिपिन्समध्ये चक्रीवादळांनंतर मंगळवारी बचावकार्यासाठी निघालेले लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट आणि क्रू मेंबर्सचा समावेश आहे. अपघाताची परिस्थिती आणि कारण निश्चित करण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
फिलीपिन्सच्या सशस्त्र दलाच्या पूर्व मिंडानाओ कमांड (ईस्टमिनकॉम) नुसार, आपत्कालीन मोहिमेसाठी दावाओ शहरावरून बुटुआनला सुपर ह्यू हेलिकॉप्टर निघाले होते. काही वेळातच हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला आणि दक्षिण अगुसान डेल सुर प्रांतातील लोरेटो शहराजवळ ते कोसळले. लष्कराच्या माहितीनुसार, बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध घेतला असता मिंडानाओ बेटावर ह्यू हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले.





























































