Us Plane Crash – अमेरिकेत प्रवासी विमान कोसळले, अपघातात दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील मराना येथे छोटे प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्यानंतर आग लागली, असे मरानाचे महापौर जॉन पोस्ट यांनी सांगितले.

इकोनॉमिक्स टाईम्स दिलेल्या माहितीनुसार, विमानात दोन प्रवासी होते अशी माहिती शहराचे प्रवक्ते विक हॅथवे यांनी दिली. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघातात अन्य कुणीही जखमी झाले नाही. तसेच या अपघातात दुसरे कोणतेही विमान सामील नव्हते, असे मराना पोलीस विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ अपघाताच्या कारणांचा तपास करीत आहे, असे पोलिसांनी सांगितले. मराना हे टक्सनच्या वायव्येस सुमारे 32 किमी अंतरावर आहे.