धक्का! चीनच्या दोन अंतराळ मोहिमा अयशस्वी, लाँग मार्च 3बी रॉकेट आणि सेरेस-2 घन इंधन रॉकेट उड्डाणाला फटका

चीनच्या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. एकाच दिवशी म्हणजे अवघ्या 12 तासांच्या अंतराने चीनच्या दोन मोहिमा अपयशी झाल्या आहेत. पहिली मोहीम लाँग मार्च 3बी रॉकेटचे उड्डाण अयशस्वी झाले. यामुळे शिजियन-32 उपग्रह नष्ट झाला आहे, तर दुसरी मोहीम सेरेस-2 घन इंधन रॉकेटला अपयश आल्याने जवळपास सहा उपग्रहांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही मोठ्या मोहिमा अपयशी झाल्याने चीनचे अंतराळातील कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण-पश्चिम चीनमधील शिचांग सॅटेलाइट लाँच सेंटरवरून दुपारी 11.55 वाजता 3बी रॉकेटचे उड्डाण करण्यात आले. हवाई क्षेत्र बंदीच्या पूर्वसूचनेनुसार हे उड्डाण नियोजित होते. अंदाजे 12 तासांनंतर चीन एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने वीचॅटवर या मिशनच्या अपयशाची पुष्टी केली. तिसऱ्या टप्प्यातील (थर्ड स्टेज) अनियमिततेमुळे शिजियन-32 उपग्रह नष्ट झाला, असेही चीनकडून सांगण्यात आले. लाँग मार्चचे एप्रिल 2020 नंतरचे पहिले पूर्ण अपयश आहे, तर 300 लाँचमध्ये लाँग मार्चचे हे पहिलेच अपयश आहे. मार्च 2024 मधील लाँग मार्च-2सी च्या अपयशानंतर (युआनझेंग-1एस अप्पर स्टेजसह) हे दुसरे सर्वात मोठे नुकसान आहे.

2025 मध्ये चीनने 92 पैकी केवळ दोन अपयश सोडले तर बाकीमध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु, 2026 या नव्या वर्षात चीनला पहिल्याच वर्षात धक्का बसला आहे. या दोन्ही अपयशांमुळे चीनचे 2026 चे पाचवे आणि सहावे लाँच अपयशी ठरले आहे. लाँग मार्चच्या अपयशानंतर अवघ्या 12 तासांत उत्तर-पश्चिम चीनमधील जिउक्वान सॅटेलाइट लाँच सेंटरवरून सेरेस-2 रॉकेटचे 17 जानेवारी रोजी उड्डाण करण्यात आले. मात्र ही मोहीमदेखील अपयशी ठरली आहे.