
हिंदुस्थानात पूल कोसळून आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन मोठय़ा संख्येने नागरिकांचा बळी जात आहे. 9 जुलै रोजी महिसागर नदीवरील गंभीरा-मुजपूर पूल कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिनिव्हातील आंतरराष्ट्रीय रस्ते महामंडळाने हिंदुस्थानातील धोकादायक पूल आणि रस्त्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जीर्ण झालेले पूल आणि खराब झालेले रस्ते यांचे वेळोवेळी ऑडिट, देखभाल आणि दुरुस्ती सरकारने केली पाहिजे, असेही सुनावले आहे.
उत्तम दर्जाचे साहित्य तसेच बांधकामांचा दर्जा या गोष्टी सर्वप्रथम लक्षात घ्यायला हव्यात, असे महामंडळाच्या अध्यक्षा के. के. कपिला यांनी म्हटले आहे.