इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पर्यटकांसाठी खुले, महिन्याच्या टूरसाठी फक्त 400 कोटी

सामना ऑनलाईन । कोलाकाता

सुट्टीत घालवायचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तोही थेट पृथ्वीबाहेर. खिशात भलीमोठी रक्कम ठेवून थेट पृथ्वीच्या बाहेर, अंतराळात म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये रहायला जाऊ शकता. नासाने स्पेस स्टेशन पर्यटकांसाठी खुले केले आहे.

नासाचे प्रमुख वित्त अधिकारी जेफ ड्विट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 पासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पर्यटनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या अवकाश स्थानकात एक रात्र घालवण्यासाठी 35 हजार डॉलर म्हणजे 25 लाख रुपये खर्च येईल.

संशोधनाव्यतिरिक्त पर्यटन आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकं खुली होणार आहेत. वर्षातून कमीत कमी दोनवेळा अवकाश स्थानकावर पर्यटकांना घेऊन जाण्याची आणि 30 दिवस एका अवकाश स्थानकावर राहण्याची सोय केली जाईल. एकावेळी 12 पर्यटकांना अवकाश स्थानकावर जाता येईल, असे नासाचे उपसंचालक रॉबिन गाटेन्स यांनी सांगितले. नासाकडून ‘एलन मस्क’ची ‘स्पेस एक्स’ आणि ‘बोइंग’ या दोन कंपन्या सध्या अंतराळ पर्यटनाकर काम करत आहेत. यासाठी एक किशेष काहनही तयार करण्याची योजना आहे. या काहनासाठी ‘स्पेस एक्स’चे’ ‘क्रू ड्रगन कॅप्सूल’ आणि ‘बोइंग’चे ‘स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट’ या दोन अंतराळयानांचा कापर केला जाणार आहे.

एका रात्रीचे 25 लाख रुपये
पर्यटकांना एका दिवसाचे अंदाजे 25 लाख रुपये मोजावे लागतील. त्यात ऑक्सिजन आणि टॉयलेटचे सात लाख 80 हजार आणि जेवण, हवा, औषधांसाठी 15 लाख 60 हजार रुपयांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या