
इंटरनेटवर प्रादेशिक भाषांतील कंटेंटचे प्रमाणही काढले आहे. सुमारे 65 टक्के लिखाण हे प्रादेशिक भाषांमधून येत आहे. त्यातही मराठी भाषेच्या कंटेंटमध्ये गेल्या वर्षभरात सातपटीने वाढ झाली आहे. तसेच महिलाही प्रादेशिक भाषांमधून विविध विषयांवर व्यक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
इंटरनेट कंटेंट मंच म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘मॉम्सप्रेसो डॉटकॉम’च्या निरीक्षणानुसार गेल्या 12 महिन्यांत मराठी भाषेत लिखाण निर्माण करण्याचे प्रमाण सात पटीने, हिंदीतील तीन पटीने, बंगाली भाषेतील तीन पटीने आणि तमीळमधील पाच पटीने काढले आहे. तसेच प्रादेशिक भाषेवर आधारित सामग्रीचे योगदान 38 टक्क्यांवरून 65 टक्के झाले आहे.
2018 मध्ये मोबाईल ऍपकरून तयार केलेले प्रादेशिक कंटेटचे प्रमाण 70 टक्के होते ते काढून 2019 मध्ये 94 टक्के झाले आहे.
2021 पर्यंत प्रादेशिक भाषांचे युजर्स हे हिंदुस्थानी इंटरनेट युजर्सच्या 75 टक्के असतील. इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचे विश्व विस्तारेल अशी माहिती ‘मॉम्सप्रेसो डॉटकॉम’चे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गुप्ता यांनी दिली.






















































