
>> शब्दांकन – राज चिंचणकर
‘बाप’पणाची जाणीव करून देणारा अनुभव कथन करत आहे लेखक, दिग्दर्शक व अभिनेता गणेश पंडित…
मी आणि अंबर हडपने लिहिलेल्या ‘बालक पालक’ या सिनेमाने 2013 या वर्षात महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता व अचानक आम्ही ‘वेगळय़ा विषयांवर काम करणारे मोठे लेखक’ वगैरे म्हणून नावारूपाला आलो होतो. त्यानंतर आम्ही पुन्हा वेगळा विषय म्हणून ‘यलो’ हा सिनेमा करायला घेतला. महेश लिमये दिग्दर्शक आणि पॅमेरामन होता. स्पेशल मुलांच्या आयुष्यावरचा प्रेरणादायी असा सिनेमा आणि या मुलांकडे पाहण्याची समाजाची नजर थोडीतरी बदलेल, हा त्यामागचा हेतूसुद्धा पारदर्शक होता. मात्र त्याच वेळी माझ्या वडिलांची तब्येत ढासळली होती, पण माझ्या डोक्यात मात्र सिनेमाशिवाय काही नव्हते. भावाने वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते आणि तेव्हा मी एकदा जाऊन त्यांना भेटून आलो होतो. तेव्हा ते अगदीच ठणठणीत होते. त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे मारून मी पुण्यात शूटिंगला निघून गेलो.
मी परत आलो तेव्हा वडिलांची तब्येत बरी होती. त्यानंतर मुंबईत शूटिंग लागले होते आणि त्याचे टेन्शन जास्त होते. कारण ‘यलो’ हा सिनेमा स्पेशल मुलांवर आधारित असला तरी तो हिंदुस्थानातला पहिला असा सिनेमा होता की, ज्यात ज्या व्यक्तीवर हा सिनेमा होता त्या व्यक्तीनेच ती व्यक्तिरेखा साकारायची होती. गौरी गाडगीळ ही ती मुलगी. जिने स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये हिंदुस्थानासाठी मेडल्स जिंकली होती. सगळय़ा स्पेशल मुलांनी स्वतःच त्यात कामे करायची असे ठरले होते. गौरीच्या लहानपणीचा रोल संजना ही मुलगी करत होती. गौरी मोठी होती, पण संजना वयाने लहान असल्याने तिला सांभाळणे खूप कठीण होते. तिने सिनेमात काय करायचे, हे मी तिच्याकडून काढून घ्यायचो. कॅमेऱयामागे मी अभिनय करत असायचो आणि माझ्याकडे पाहून ती ते करायची. मी संजनाच्या आयुष्याचा भाग बनलो होतो.
मुंबईतले शेडय़ूल लागले आणि पहिला सीन सुरू झाला. पॅमेऱयामागे मी टाळय़ा वाजवत उडय़ा मारत होतो आणि माझ्याकडे बघून संजना तसे करत होती. पहिल्या टेकला शॉट ‘ओके’ होऊनसुद्धा मला ते इतरांच्या चेहऱयावर मात्र दिसले नाही. मी बाहेर आलो तेव्हा जाणवले की, सगळय़ांच्याच नजरा माझ्याकडे आहेत. मला कारण कळेना. एवढय़ात अंबर येऊन मला म्हणाला, ‘‘घरी जरा पह्न कर. तुझ्या बाबांची तब्येत जास्त खराब झाली आहे.’’ त्याच्या सांगण्यात आणि आजूबाजूला अचानक पसरलेल्या शांततेत मला काय ते कळून चुकले. मी माझ्या मावसभावाला पह्न केला आणि त्याने बाबा गेल्याची बातमी सांगितली.
मी घरी गेलो. माझ्या डोक्यावरचा बापाचा हात कायमचा गेला होता. वडिलांचे अंत्यसंस्कार पार पडले. तो दिवस कसाबसा पार पडला आणि आईच्या परवानगीने दुसऱया दिवशी सकाळी सातच्या शिफ्टला मी शूटिंगला हजर होतो. माझी नजर संजना आणि गौरीला शोधत होती. माझ्याशिवाय त्या कशा काम करत असतील, हा प्रश्न मला सतत भेडसावत होता. संजना समोर दिसली आणि डोळय़ांत पाणी आले. मी तिला उचलून घेतले आणि सेटवर एक चक्कर मारून आलो. हळूहळू मी नॉर्मल झालो आणि मग नुकताच बाप गमावलेला मी तिची आई आणि बाप दोन्ही होऊन गेलो. नंतर गौरी आली. आम्ही तिघेजण खेळलो, जेवलो, शूटिंग केले आणि दिवस संपलासुद्धा…!
त्यानंतर डोक्यात विचार आला की, कालचा दिवस आणि आजचा दिवस यात फरक काय होता? तर काल मी काहीतरी गमावले होते आणि आज मला काहीतरी गवसले होते. काल ‘बाप’ गमावला आणि आज ‘बापपण’ कमावले होते. मग जाणवले की, एका बापाला आपली सगळी दुःखं विसरायला लावणे हे फक्त मुलांच्या हातात असते आणि एक मोठे गुपित उलगडले. दिवसभराचा प्रवास करत सगळी टेन्शन्स सांभाळत घरी येणारा माझा बाप आम्हा भावंडांना बघून स्माइल कसा काय करू शकायचा? तो कधी थकला कसा नाही? असे कोणते औषध होते त्याच्याकडे? गौरी आणि संजनाने त्या प्रश्नांची उत्तरे मला दिली होती.



























































