
हिंदुस्थानसह जगभरातील शेअर बाजारामध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. वाढते व्याजदर, जागतिक स्तरावरील घडामोडी, बेरोजगारी आणि ट्रम्प प्रशासनाकडून सुरू असलेल्या निर्णयांच्या धडाक्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सावध झाले असून अनेक जणांनी म्युच्युअल फंडकडे मोर्चा वळवला आहे. सुरक्षित आणि स्थिर परताव्यासाठी गुंतवणूकदारांनी सोने, म्युच्युअल फंड, रोखे आणि एफडीमध्येही गुंतवणूक वाढवली आहे.
बाजारामध्ये सध्या अनेक म्युच्युअल फंड आपल्याला दिसतात. त्यातल्या त्यात इक्विटी, हायब्रिड आणि डेब्ट फंड अशा विविध प्रकारच्या फंडांकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल आहे. बाजारातील अनिश्चिततेमुळे म्युच्युअल फंड आर्थिक स्थिरता मिळवण्याचा चांगला पर्याय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मार्केटमध्ये सध्या लार्ज कॅप फंडमध्ये Nippon India Large Cap Fund, ICICI Prudential Bluechip Fund हे आणि फ्लेक्सी कॅप फंडमध्ये Parag Parikh Flexi Cap Fund, Kotak Flexi Cap Fund आणि हायब्रिड फंडमध्ये HDFC Balanced Advantage Fund आणि SBI Equity Hybrid Fund, तर डेब्ट फंडमध्ये ICICI Prudential Corporate Bond Fund आणि HDFC Short Term Debt Fund हे फंड सध्या चर्चेत आहेत. यासह ऑगस्टमध्ये आणखी काही म्युच्युअल फंड मार्केटमध्ये लिस्ट होत आहेत.
1. Jio BlackRock Mutual Fund – जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड पाच इंडेक्स फंड एनएफओ लॉन्च करणार आहे. 5 ते 12 ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी हा फंड खुला असणार आहे. 500 रुपयांपासून यात गुंतवणूक करता येणार आहे.
2. Groww Mutual Fund – ग्रोव म्युच्युअल फंड 6 ऑगस्टला ग्रोव निफ्टी नेक्स 50 ईटीएफ आणि ग्रोव निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड लॉन्च करणार आहे. यात किमान गुंतवणूक 500 रुपये आहे.
3. Baroda BNP Paribas Overnight Fund – बडोदा बीएनपी परिबास गोल्ड ईडीएफ फंड ऑफ फंड्स 4 ऑगस्ट रोजी उघडणार आहे. यातील किमान गुंतवणूक 1 हजार रुपये आहे.
4. Kotak Mutual Fund – कोटक म्युच्युअल फंड कोटक अॅक्टिव्ह मोमेन्टम फंड लॉन्च केला आहे. हा फंड सार्वजनिक गुंतवणुकीसाठी 29 जुलै 2025 पासून ते 12 ऑगस्ट 2025 पर्यंत खुला असेल. NFO कालावधीत गुंतवणूकदार या फंडात कमीतकमी 5000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात. तर SIP साठी 500 रुपये आवश्यक (500 रु. चे कमीत कमी 10 हप्ते आवश्यक).
5. Mirae Asset Mutual Fund – मिरे अॅसेट म्युच्युअल फंड मिरे अॅसेट मल्टी फॅक्टर पॅसिव्ह फंड ऑफ फंड्स लाँच करणार आहे. यातील किमान गुंतवणूक 5 हजार रुपये रुपये आहे.
ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब फुटला, शेअर बाजार हादरला; सेन्सेक्स 350, निफ्टी 150 अकांनी घसरला