लाँच होण्याआधीच आयफोन 11चे डुप्लिकेट फोन बाजारात

ऍपलचा लेटेस्ट आयफोन-11 हा 10 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. या फोनसोबत वायरलेस ईअरपॉड्स आणि चार्जर मिळणार आहे. दरम्यान, लॉन्चिंगच्या आधीच या फोनसारखा हुबेहुब फोन चिनी बाजारात आला आहे.

युटय़ूबवर ‘Everything Apple Pro’ ने या नकली फोनचा अनबॉक्सिंग व्हिडीओ अपलोड केला आहे. हा फोन हुबेहुब आयफोन 11 सारखा दिसत आहे. नकली फोन ज्या बॉक्समधून दिला जाता आहे. त्यावर आयफोनच्या नव्या थीमचा वॉलपेपर लावला आहे. बॉक्सवर दोन्ही बाजूला ऍपलचा लोगोदेखील आहे.

आयफोन 11 मध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम iOS 13 असून नकली फोनमध्ये मात्र iOS 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. चीनी बाजारात नकली आयफोनची किंमत फक्त 100 डॉलर (सात हजार रुपये) आहे.

आयफोन 11 चे फिचर्स

  • 5.8 इंचाचा फूल व्हू डिस्प्ले
  • 14, 12, 12 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा
  • सेल्फीसाठी 10 मेगापिक्सल कॅमेरा
  • 512 जीबी स्टोअरेज
  • वॉटरप्रूफ फोन
  • 4000 mAh ची बॅटरी
  • डुअल सिम सेट
आपली प्रतिक्रिया द्या