हिंदुस्थानातून दोन लाख कोटींचे आयफोन निर्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2025 मध्ये हिंदुस्थानच्या कारखान्यात बनवलेले 23 अब्ज डॉलर म्हणजेच दोन लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन विदेशात निर्यात करण्यात आले आहेत. निर्यात करण्यात आलेल्या फोनमध्ये 76 टक्के भागीदारी ही एकटय़ा आयफोनची आहे.

देशात आयफोन बनवण्यासाठी सध्या पाच असेंबली प्लांट सक्रिय आहेत. यात तीन प्लांट हे टाटा समूह कंपनीकडे आहेत, तर दोन प्लांट हे फॉक्सकॉनकडे आहेत. या युनिट्सला जवळपास 45 सप्लायर कंपन्यांचा सपोर्ट मिळत आहे. हिंदुस्थानातून जे आयफोन निर्यात केले आहेत, त्यात सर्वात जास्त निर्यात ही अमेरिकेला करण्यात आली आहे.