IPL 2020 – महिला की पुरुष? तुमचाही झाला ना गैरसमज; जाणून घ्या कोण आहेत हे पंच

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत सोमवारी प्रेक्षकांची पर्वणी झाली. ‘सुपर संडे’ला खेळले गेलेले दोन्ही सामने टाय झाले. सायंकाळी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना आणि नंतर सुपर ओव्हर देखील टाय झाला. तसेच दुपारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघातील सामनाही टाय झाला. दोन्ही लढतीचा निकाल सुपर ओव्हरने लागला. पहिला सामना केकेआरने तर दुसरा पंजाबने आपल्या नावे केला.

रविवारचा दिवस जसा सुपर ओव्हरने गाजला तसाच आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत राहिला. कोलकाता आणि हैद्राबाद लढतीत मैदानात उतरलेल्या पंचांची सोशल मीडियावर चर्चा होती. पश्चिम पाठक (Paschim Pathak) नाव असणारे हे पंच महिला की पुरूष असाच गैरसमज काही लोकांचा झाला. याला कारण त्यांचे लांबसडक केस.

img_20201019_103343

अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना आयपीएलमध्ये महिला पंच मैदानावर दिसल्याचे म्हटले. तर अनेकांनी त्यांची तुलना थेट रॉकस्टार चित्रपटातील रणबीर कपूरशी केली. दिवसभर याचीच चर्चा सुरू होती. मात्र पश्चिम पाठक पहिल्यांदाच मैदानात उतरलेले नाहीत. बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते पंच असून याआधी 2014 आणि 2015 ला झालेल्या हंगामात देखील ते दिसले होते.

IPL 2020 -‘सुपर’ संडे, कोलकाताने हैद्राबादचा सुपर ओव्हरमध्ये केला पराभव, फर्ग्युसनचा बळींचा ‘पंच’

पश्चिम पाठक यांनी आयपीएलच्या 4 लढतीत पंच म्हणून काम पाहिले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 कसोटी आणि 3 एक दिवसीय लढतीत देखील त्यांनी पंच म्हणून कामगिरी केली आहे. 2009 पासून ते बीसीसीआयच्या पंचांच्या यादीत असून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत ते विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत.

screenshot_2020-10-19-10-33-19-684_com-android-chrome

आपली प्रतिक्रिया द्या