IPL 2025 बंगळुरूची टॉप-2मध्ये राहण्याची धडपड, आज साखळीतच बाद झालेल्या हैदराबादचे आव्हान

जबरदस्त फॉर्मात असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत टॉप-2 मध्ये आपले स्थान राखण्यासाठी सज्ज झालेत. दुसरीकडे प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान संपलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ बंगळुरूपुढे आव्हान निर्माण करू शकतो. त्यामुळे उभय संघांमध्ये एक तुल्यबळ सामना बघायला मिळू शकतो.

बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यातील सामना खरं तर बंगळुरूमध्ये होणार होता, मात्र पावसाच्या अंदाजामुळे हा सामना लखनौला हलविण्यात आला. बंगळुरूने 17 गुणांसह प्ले ऑफचे तिकीट आधीच बुक केले आहे, मात्र इलिमिनेटर फेरीपासून वाचण्यासाठी हा संघ टॉप-2 मध्ये राहण्यासाठी जोर लावताना दिसणार आहे. बंगळुरूला विजयासाठी पसंती असली तरी हैदराबादकडेही ट्रव्हिस हेड व हेन्री क्लासेन असे गेम चेंजर खेळाडू आहेत हे बंगळुरूला विसरून चालणार नाही. बंगळुरूने कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सुरेख कामगिरी केली आहे. प्रमुख खेळाडू विराट कोहलीने 11 सामन्यांत 505 धावा फटकाविल्या आहेत. पाटीदार आणि जितेश शर्मा यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. गोलंदाजीत कृणाल पंडय़ा व यश दयाल यांनी कमाल केली होती. त्यामुळे हैदराबादविरुद्ध बंगळुरूचे पारडे या घडीला तरी सरसच दिसत आहे.दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादकडे प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. ट्रव्हिस हेड व हेन्रीक क्लासन यांच्यामध्ये पुठल्याही गोलांदाजी ताफ्याची दाणादाण उडविण्याची क्षमता आहे. हेडने बंगळुरूविरुद्धच्या मागील लढतीत 39 चेंडूंत शतक ठोकले होते,

सलग सहा विजय लकी ठरणार

मुंबई इंडियन्स टॉपवर पोहचो अथवा न पोहचो, त्यांच्यासाठी सलग पाच आणि सहा विजय आजवर लकी ठरलेत. 2013, 2015, 2017 आणि 2020 या चारही स्पर्धांत मुंबई इंडियन्सने सलग पाच आणि त्यापेक्षा अधिक विजय मिळवत जेतेपद पटकावले आहे. यंदाही त्यांनी तशीच कामगिरी केलीय आणि ते प्ले ऑफमध्येही पोहोचलेत. म्हणजेच सहाव्या जेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलेय. फक़्त 2019 साली पटकावलेल्या जेतेपदातच ते सातत्यपूर्ण विजय मिळवू शकले नव्हते. तरीही ते चॅम्पियन्स ठरलेत. मुंबईने यंदा अकराव्यांदा प्ले ऑफ गाठलेय. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात म्हणजे 2008 साली त्यांनी पराभवाच्या चौकारानंतर विजयांचा षटकार ठोकत आपला दबदबा दाखवला होता, पण या स्पर्धेत ते प्ले ऑफही गाठू शकले नाही. त्याचप्रमाणे 2010 च्या स्पर्धेत त्याने सलग पाच विजयांची कामगिरी करत प्रथमच आयपीएलचे प्ले ऑफ गाठले. मग अंतिम फेरीही गाठली, पण त्यांना जेतेपद गाठता आले नाही. एवढेच नव्हे तर 2011, 2012 आणि 2014 या तीन मोसमात मुंबईने सलग विजय न मिळवताही प्ले ऑफ गाठले होते, पण ते एकदाही अंतिम फेरीत पोहोचले नाही.