IPL 2025 – हैदराबादचा मोठा धमाका; RCB चा धुव्वा उडवत 42 धावांनी जिंकला सामना

IPL 2025 मध्ये प्ले ऑफसाठी पात्र ठरलेल्या RCB चा स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेलेल्या हैदराबादने धुव्वा उडवला आहे. इशान किशनने (नाबाद 94 धावा) केलेल्या झंझावाती खेळीमुळे हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 231 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या RCB ने दमदार सुरुवात करत 80 धावांनी धमाकेदार सलामी दिली. विराट कोहली (43) बाद झाल्यानंतर संघाची गाडी जी रुळावरुन घसरली ती थांबलीच नाही. विकट पडत गेल्याने 19.5 षटकांत संपूर्ण संघ 189 धावांमध्येच बाद झाला आणि हैदराबादने 41 धावांनी मोठा विजय साजरा केला.