IPL 2026 – एक-दोन नव्हे 6 यॉर्कर्सचा भेदक मारा, नेट प्रॅक्टिसमध्ये अर्जुन तेंडुलकरचा जलवा; पाहा Video

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्स सोडून लखनौ सुपर जायंट्समध्ये (LSG) सामील झालेला अर्जुन तेंडुलकर सध्या आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अद्याप अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नसले तरी, नेट प्रॅक्टिसमधील त्याच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन अत्यंत अचूकतेने ‘यॉर्कर्स’ टाकताना दिसत असून, त्याने लखनौचा कर्णधार रिषभ पंत यालाही बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. अर्जुनच्या या धारदार गोलंदाजीमुळे संघ व्यवस्थापनावर त्याला मैदानात उतरवण्यासाठी दबाव वाढत आहे.

गोव्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या 26 वर्षीय अर्जुनच्या मेहनतीचे कौतुक दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग यानेही केले आहे. युवराजच्या मते, अर्जुनचा खेळाप्रती असलेला दृष्टिकोन अत्यंत व्यावसायिक आणि तीक्ष्ण आहे. ९ एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात लखनौ संघ अर्जुन तेंडुलकरला ‘सरप्राईज पॅकेज’ म्हणून संधी देणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.