कोण ठरणार महागडा क्रिकेटपटू? आयपीएलचा मिनी लिलाव आज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षी आयपीएलचा महालिलाव आयोजित करण्यात येणार होता. दोन जादा संघांचाही या स्पर्धेत समावेश पक्का होता. पण कोरोनामुळे सर्व गणित बिघडले. बीसीसीआयने आर्थिक बाबींकडे लक्ष ठेवून आपली ही योजना पुढल्या वर्षी ढकलली. त्यामुळे या वर्षी मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. चेन्नई येथे उद्या होणाऱया या लिलावात 164 हिंदुस्थानी, 125 परदेशी आणि तीन असोसिएट देशांतील मिळून एकूण 292 क्रिकेटपटूंवर बोली लावण्यात येईल. याप्रसंगी मनाजोगते क्रिकेटपटू आपल्या संघात घेण्यासाठी आठ संघ मालकांमध्ये कमालीची चुरस लागेल हे निश्चित. यावेळी सर्वाधिक बोली कोणत्या क्रिकेटपटूंवर लागते हे पाहायला नक्कीच आवडेल.

दोशी, किरमाणी, तेंडुलकर यांची मुलेही शर्यतीत

आयपीएल लिलावात माजी क्रिकेटपटूंच्या मुलांनाही स्थान देण्यात आले आहे. सय्यद किरमाणी यांचा मुलगा सादिक किरमाणी, दिलीप दोशी यांचा मुलगा नयन दोशी आणि सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यावरही आयपीएल लिलावात बोली लागेल. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करणाऱया खेळाडूंना वगळण्यात आल्यामुळे या यादीतील खेळाडूंच्या निवडीवरही टीका होऊ लागली आहे.

सर्वाधिक दोन कोटींची बेस प्राईज असलेले खेळाडू

हरभजन सिंग, केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, स्टीवन स्मिथ, शाकीब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय, मार्प वूड.

संघ मालकांकडे उपलब्ध असलेली रक्कम

  • चेन्नई – 19.90 कोटी
  • दिल्ली – 13.40 कोटी
  • पंजाब – 53.20 कोटी
  • कोलकाता – 10.75 कोटी
  • मुंबई – 15.35 कोटी
  • राजस्थान – 37.85 कोटी
  • बंगळुरू – 35.40 कोटी
  • हैदराबाद – 10.75 कोटी

नियम असे असतील

प्रत्येक संघ मालकांसाठी एक रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्या रकमेच्या वर कोणत्याही संघ मालकांना या लिलावात खर्च करता येणार नाही. 85 कोटी रुपये इतकी मर्यादा या लिलावात ठेवण्यात आली आहे. या लिलावात पंजाबकडे सर्वाधिक 53.20 कोटी खेळाडूंवरील बोली लावण्यासाठी असणार आहे. z राइट टू मॅच कार्ड आता संघ मालकांना वापरता येणार नाही. त्यामुळे त्यांनी रिलीज केलेल्या खेळाडूंना पुन्हा संघात घेण्यासाठी त्यांना बोली लावावी लागणार आहे. z प्रत्येक संघाकडे हिंदुस्थानचे जास्तीत जास्त 25 व कमीत कमी 17 खेळाडू असणे अनिवार्य आहे. तसेच आठ परदेशी क्रिकेटपटू संघात असावे.