आयपीएलआधी कोलकाता नाईट रायडर्सला दणका, या खेळाडूला ठरवले अपात्र

1415

आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या वयाचा खेळाडू ठरलेला प्रवीण तांबे हा एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 13 व्या सिझनला मुकणार आहे. प्रवीण तांबे याने बीसीसीआयचे नियम मोडल्याने त्याच्यावर कारवाई म्हणून त्याला आयपीएल खेळण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. प्रवीण तांबेला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाखात विकत घेतले होते.

praveen-tambe-11

प्रवीण तांबे हा गेल्या वर्षी अबू धाबी येथे टी-10 लीगमध्ये सिंधीज या संघातर्फे खेळला होता. या स्पर्धेत खेळून त्याने बीसीसीआयच्या परदेशी लीगमध्ये खेळण्याच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई म्हणून त्याला आयपीएलसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. ‘प्रवीण तांबेने बीसीसीआय तसेच राज्याच्या असोसिएशनकडून ना हरकत सर्टिफिकेट न घेता या लीगमध्ये भाग घेतला होता. बीसीसीआयकडून खेळाडूंना फक्त एकदिवसीय, काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी दिली जाते. त्यामुळे प्रवीण तांबेसा आयपीएल खेळविता येणार नाही’ असे आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले

प्रवीण तांबे हा फिरकीपटू असून त्याने 61 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 67 विकेट घेतले. तांबेने आयपीएलचे 33 सामने खेळले असून 30.46 च्या सरासरीने त्याने 28 विकेट्स घेतल्या आहेत. याआधी तो तीन वर्षापूर्वी 2016 मध्ये हैदराबादकडून आयपीएल खेळले होते.

आपली प्रतिक्रिया द्या