
सीमेवर वाढलेल्या तणावाच्या स्थितीमुळे आयपीएलच्या क्रिकेटयुद्धाला साप्ताहिक विराम देण्यात आला होता. मात्र आता हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यामुळे हे क्रिकेटयुद्ध आता 9 दिवसांच्या विश्रांतीनंतर 17 मेपासून सुरू होतेय. तसेच लीगचा अंतिम सामना 3 जूनला खेळविला जाणार असून उर्वरित 17 सामने मुंबई, बंगळुरु, जयपूर, दिल्ली, लखनौ आणि अहमदाबाद या सहा ठिकाणीच खेळविले जाणार आहेत. तसेच पंजाब आणि दिल्ली यांच्यात अर्धवट थांबविण्यात आलेला सामना पुन्हा नव्याने खेळविला जाणार असल्याचेही आज जाहीर केले. रविवारी दोन-दोन साखळी सामने खेळविले जातील. तसेच प्ले ऑफच्या लढती 29, 30 मे आणि 1 आणि 3 जूनला होतील. साखळीतील 13 सामन्यांची ठिकाणं जाहीर करण्यात आली असली तरी प्ले ऑफची शहरे नंतर जाहीर केली जाणार आहेत.