इक्बाल कासकरची एनसीबी करणार चौकशी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची आता नाकाxटिक्स पंट्रोल ब्युरो (एनसीबी) चौकशी करणार आहेत. सध्या ठाणे जेलमध्ये असलेल्या कासकरला गुरुवारी प्रोडक्शन वॉरंटवर पोलीस बंदोबस्तात ‘एनसीबी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणले जाणार आहे.

‘एनसीबी’चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने भिवंडीच्या पडघा येथील अर्जुन अली टोल प्लाझा येथे सापळा रचून शबीर उस्मान शेख आणि अहमद ताझाकडून 12 किलो चरस जप्त केले होते. चौकशीत ते चरस हे जम्मू-कश्मीर येथून आल्याचे उघड झाले. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचे नाव समोर आले. काही महिन्यांपूर्वी शबीरने काही चरस हे इक्बालला दिले होते. इक्बालच्या चौकशीसाठी ‘एनसीबी’ने ठाणे जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट सादर केले आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी इक्बालला पोलीस बंदोबस्तात ‘एनसीबी’च्या कार्यालयात आणले जाणार आहे. चार वर्षांपूर्वी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी इक्बाल कासकरला अटक केली होती तेव्हापासून इक्बाल हा ठाणे जेलमध्ये आहे.

इक्बालसाठी प्रश्नावली तयार

चरस तस्करीप्रकरणी इक्बालची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी ‘एनसीबी’ने खास प्रश्नावली तयार केली आहे. ‘एनसीबी’च्या कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या