इराणला भूकंपाचा हादरा; तुर्कीत 9 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम इराणला आज 5.7 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपामुळे इराण आणि तुर्कस्तानातील पर्वतराजीतील गावांतील शेकडो घरे कोसळली. या भूकंपाने तुर्कस्तानात 9 जणांचे बळी घेतल्याची माहिती तुर्कस्तानचे आरोग्यमंत्री फाहरेट्टीव कोका यांनी दिली. इराणमधील खोय शहर आणि तुर्कस्तानच्या व्हान प्रांत यांच्या मध्यावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी पत्रकार परिषदेत बोलताना तुर्कीच्या बास्कुले जिल्ह्यात भूकंपामुळे तीन मुले आणि चार प्रौढांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. कोका यांनी नंतर भूकंपात 9 जणांचा मृत्यू तर 37 जण जखमी झाल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. इराणच्या अधिकृत आयएनआरए या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार क्योतूर पर्वतराजीतील 43 गावांत भूकंपाने हाहाकार केला आहे. भूकंपामुळे किमान 75 लोक इराणमध्ये जखमी झाले आहेत. तुर्कीच्या व्हान प्रांतातील चार गावांत भूकंपाने घरे जमीनदोस्त केली आहेत. ओझपिनार गावात सातजणांचा भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनेत म्त्यू झाला आहे.