
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, या युद्धाच्या भीषणतेमुळे हिंदुस्थानने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर आणि इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त कारवायांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर हिंदुस्थानी सरकारने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली असून आखाती देशांतील हिंदुस्थानी नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली जारी केली आहे.
नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “आम्ही सर्व बाजूंना संयम बाळगण्याचे, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. तणाव कमी करण्यासाठी आणि मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिचा अवलंब केला पाहिजे. सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, असे हिंदुस्थानने म्हटले आहे.
विशेषतः इराण, इस्रायल आणि शेजारील देशांमध्ये राहणाऱ्या लाखो हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हिंदुस्थानसमोर मोठा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या देशांतील हिंदुस्थानी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंदुस्थानी दूतावासांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केले असून तेथील परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे.
India is deeply concerned at the recent developments in Iran and the Gulf region. We urge all sides to exercise restraint, avoid escalation, and prioritise the safety of civilians. Dialogue and diplomacy should be pursued to de-escalate tensions and address underlying issues.… pic.twitter.com/FE065OjVTp
— ANI (@ANI) February 28, 2026

























































