
झिम्बाब्वे आणि आयर्लंड या दोन संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फलंदाज पीटर मूरने 35 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आतापर्यंत 85 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याने निवृत्त होण्याचा निर्णय आज जाहीर केला. हरारे येथे जन्मलेल्या मूरने आयर्लंडला जाण्यापूर्वी झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. नोव्हेंबर 2014 मध्ये मूरने मिरपूर येथे बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2016 मध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध अनुक्रमे त्याने कसोटी आणि टी–20 मध्ये पदार्पण केले. तो झिम्बाब्वेकडून 49 एकदिवसीय, 21 टी-20 आणि 8 कसोटी सामने खेळला आहे. त्याच्या आजीच्या आयर्लंड वारशामुळे त्याच्याकडे आयर्लंड पासपोर्ट होता. त्यामुळे ऑक्टोबर 2022 मध्ये तो आयर्लंडकडून क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरला. मार्च-एप्रिल 2023 मध्ये बांगलादेश आणि श्रीलंकेच्या कसोटी दौऱयासाठी त्याची आयर्लंड संघात प्रथम निवड करण्यात आली. त्यानंतर त्याने आयर्लंडकडून 7 कसोटी सामने खेळले.