अविश्वसनीय….जंगलही श्वास घेतयं, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कॅनडा

सजीव प्राणी श्वास घेतात हे आपल्याला माहित आहे. तसेच झाडांची पानं सूर्य प्रकाशात वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन उत्सर्जित करतात हे आपण शाळेमध्ये शिकलोय. मात्र त्यांना कधी प्रत्यक्ष श्वास घेताना आपण बघितलेले नाही. पण कॅनडातील क्यूबेक जंगलाचा एक भाग मानवाप्रमाणेच श्वसन करत असल्याचं समोर आलं आहे. सोशल साईटवर या जंगलाचा श्वास घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. थोडासा भीतीदायक असलेल्या या व्हिडीओत जंगलातील जमीन श्वास घेताना बघून निसर्गतज्ज्ञही चक्रावले आहेत.

या व्हिडीओत जंगलातील जमीन अचानक मानवाप्रमाणे श्वास घेत असल्याचं दिसत आहे. जंगलात फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे. क्यूबेक जंगल अचानक श्वास घेऊ लागले. या मथळ्याखाली त्याने हा व्हिडीओ सोशल साईटवर पोस्ट केला. त्याच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. त्यामुळे हा भुताटकीचा प्रकार असावा असा अनेकजणांचा समज झाला आहे. पण तज्ज्ञांनी मात्र जंगलात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जंगल श्वास घेत असल्याचा भास होतो असे म्हटले आहे. पण त्याच्याशी संबंधित इतर माहिती तज्ज्ञांना देता आलेली नाही. यामुळे क्यूबॅकचे जंगल जिवंत झाले आहे. असे म्हटले जात आहे. आतापर्यंत 80 हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले असून फेसबूक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवरही शेकडो लांकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.