ईसापुर धरणाचे गेट उघडले ;1374 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

पैनगंगा प्रकल्प इसापुर धरणाचे दोन दरवाजे 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वा. उघडण्यात आले. यामुळे हदगाव, उमरखेड, हिमायतनगर पुसद, कळमनुरी, महागाव, तालुक्यातील पैनगंगा नदी तीरावर असलेल्या सर्व गावातील नागरिकांनी सावधान राहावे असे आव्हान नियंत्रण कक्ष उपविभागीय अभियंता एच. एस. धुळगुंडे यांनी केले आहे.

मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेले ईसापुर धरण आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 1264.72 दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा 949.80 दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 440.85 मीटर झाली आहे. ईसापुर धरण 98.51 टक्के भरले असल्यामुळे धरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाण्याचा विसर्ग पेन गंगा नदी पात्रात करण्यात येत आहे.

धरणाचे सध्या दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धनाच्या उघडण्यात आलेल्या दोन दरवाजामधून 1474 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणामध्ये अतिरिक्त पाण्याची आवक वाढल्यास अजून दरवाजे उघडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पैनगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकऱ्यांनी आपले शेती उपयोगी साहित्य, जनावरे, पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे पूर नियंत्रण कक्ष ईसापुर धरण यांनी कळवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या