इसिसच्या नव्या म्होरक्याचाही खात्मा करू – अमेरिका

562

इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याचा खात्मा केल्यानंतर आता नव्या म्होरक्याचाही लवकरच खात्मा करू, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. बगदादीचा खात्मा केल्यानंतर इसिसची सूत्रे अबू इब्राहिम अल हाशिमी अल कुरेशी याने स्वीकारली आहेत.

अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱयाने म्हटले की, इसिसच्या नव्या म्होरक्यालाही जग ओळखत नाही. त्याच्याशी संबंधित असलेल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर लक्ष ठेवून आहोत. इसिसच्या दहशतवाद्यांनाही कुरेशीबद्दल काही माहिती नाही. त्याचा लोकांवरही काही खास प्रभाव नाही. अशा अनोळखी म्होरक्याला आम्ही लवकरच संपवू, असा विश्वास बोलून दाखवला.

व्हाइट हाऊसमध्ये ‘कॅनन’ची इण्ट्री होणार
अबू बकर अल बगदादीचा खात्मा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया अमेरिकन लष्करातील कुत्रा कॅननला लवकरच व्हाइट हाऊसचा दौरा करणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅननचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, ‘गेल्या आठवडय़ात तो दुसऱया एका मोहिमेत असल्यामुळे तो व्हाइट हाऊसमध्ये आला नाही. बगदादीचा खात्मा करण्याच्या मोहिमेत तो जखमी झाला होता. त्यानंतर काही दिवसांच्या उपचारानंतर तो दुसऱया मोहिमेत सहभागी झाला. तो लवकरच व्हाइट हाऊसला भेट देणार आहे. डोनाल्ड ट्रम्प नाही तर खरा हीरो कॅननच आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या