
रशियातून कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या तुर्कीच्या तेलवाहू जहाजावर गुरुवारी पहाटे काळ्या समुद्रात भीषण हल्ल्याची घडली. मानवरहित नौकेद्वारे हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता तुर्कीचे परिवहन मंत्री अब्दुलकादिर उरालोघलू यांनी व्यक्त केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सिएरा लिओनचा ध्वज असलेले आणि तुर्की कंपनीमार्फत चालवल्या जाणारे हे जहाज रशियातून कच्चे तेल घेऊन येत होते. मध्यरात्रीनंतर जहाजाच्या इंजिन रूममध्ये मोठा स्फोट झाला. हा हल्ला आकाशातील ड्रोनने नाही, तर मानवरहित नौकेने केल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आपत्कालीन केंद्राला तात्काळ याबाबत माहिती देण्यात आली, असे मंत्री उरालोघलू यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
जहाजाच्या इंजिन रूमला लक्ष्य करून करण्यात हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला नेमका कोणत्या देशाच्या समुद्री हद्दीत झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, बोस्फोरस सामुद्रधुनीपासून 30 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हा स्फोट झाला.
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी तुर्कीचे जवळचे संबंध असल्याने या घटनेमुळे राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुर्कीने आपली बचाव पथके घटनास्थळी पाठवली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
























































