
इराण आणि इस्रायलमधील प्रत्यक्ष संघर्षाने आता टोक गाठले असून, संपूर्ण मध्य पूर्व आशियात युद्धाचे ढग दाटले आहेत. तेहरानशी संबंधित ठिकाणांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या वृत्तामुळे संपूर्ण प्रदेशात लष्करी हालचाली वेगवान झाल्या असून जगाचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पत्रकार परिषद घेत इस्रायली जनतेच्या धैर्याचे आणि एकतेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले देश सध्या एका कठीण काळातून जात असून अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करत आहे. गेल्या आठवड्यात देशाला अशांतता आणि लष्करी कारवायांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले, मात्र अशा परिस्थितीतही नागरिकांनी दाखवलेली जिद्द आणि देशाप्रती असलेली निष्ठा अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले केले. शिवाय शत्रूंसाठी पुढे काही खास सरप्राईज असल्याचाही इशारा दिला आहे.
VIDEO | Jerusalem: Benjamin Netanyahu addresses a press conference.
(Source: Third Party)#Jerusalem pic.twitter.com/LSAyKJMsMr
— Press Trust of India (@PTI_News) March 7, 2026
पंतप्रधान नेतान्याहू यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने गाझा, लेबनॉन, सीरिया आणि इराणचा उल्लेख केला. या सर्व ठिकाणी इस्रायलने आपल्या शत्रूंविरुद्ध प्रभावी लष्करी कारवाई केली असून त्यात मोठे यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, हा संघर्ष अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही, याची जाणीव करून देत त्यांनी देशाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लष्करी कारवाईचा पुढचा टप्पा नजीकच्या भविष्यात सुरू होऊ शकतो आणि त्यामध्ये शत्रूंसाठी काही खास सरप्रायझेस असतील, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत राष्ट्रीय एकता हाच देशाचा सर्वात मोठा आधार असल्याचे नेतान्याहू यांनी सांगितले. देशाची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून नागरिकांनी सुरक्षा दलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.




















































