
सामना ऑनलाईन । चेन्नई
हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आपल्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-४३ च्या मदतीने गुरुवारी सकाळी श्रीहरीकोट्टा येथून ८ देशांचे ३० उपग्रह अवकाशात सोडणार आहे. या ३० पैकी २३ उपग्रह अमेरिकेचे आहेत. सोबत हिंदुस्थानचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग (हिसआय एस) सॅटेलाइटदेखील अंतराळात झेपावणार आहे. या मोहिमेत यश मिळाल्यास पीएसएलव्हीचे हे १३वे यशस्वी प्रक्षेपण ठरणार आहे.
Update #4#ISROMissions#HysIS
Here’s all you wanted to know about tomorrow’s #PSLVC43 launch.
View complete video on https://t.co/SAdLCr9rCP or https://t.co/MX54Cx57KU pic.twitter.com/qZkTvpTQEj
— ISRO (@isro) November 28, 2018
सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही – सी ४३ या उपग्रह वाहून नेणाऱ्या हायटेक अग्निबाणाच्या उड्डाणाचे काउंटडाऊन बुधवारी पहाटे ५.५८ वाजता सुरू झाले आहे. गुरुवारी सकाळी ९.५८ वाजता त्याचे प्रक्षेपण होणार आहे.
Update #3#ISROMissions
Catch all the live action of #PSLVC43 launch from Satish Dhawan Space Centre, Sriharikota with 31 satellites onboard tomorrow on @DDNational. Telecast begins at 09:30 (IST). pic.twitter.com/hpURjrrwnJ— ISRO (@isro) November 28, 2018
हिंदुस्थानचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह ( हिसआयएस ) पीएसएलव्ही सी – ४३ मोहीमेचा प्राथमिक उपग्रह आहे. हा उपग्रह सूर्याच्या समकक्षेत ९७.९५७ अंशात फिरणार असून ५ वर्ष कार्यरत राहणार आहे. या उपग्रहासह अवकाशात झेपावणाऱ्या ३० विदेशी उपग्रहांपैकी एक मायक्रो तर २९ नॅनो उपग्रह आहेत. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन या ८ देशांचे हे उपग्रह असणार आहेत.
Update #2#ISROMissions#PSLVC43
The countdown for the launch of #PSLVC43 carrying Indian satellite #HysIS and 30 satellites from 8 countries began today at 05:58 (IST) from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. The launch is scheduled at 09:58 (IST) tomorrow. pic.twitter.com/E0xPn95llc— ISRO (@isro) November 28, 2018
हिसआयएस उपग्रह वातावरणाचा अभ्यास करणार
हिसआयएस उपग्रह पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील इन्फ्रारेड किरणांच्या विद्युत चुंबकीय लहरींचा पृथ्वीवरील वातावरणावर होणाऱ्या परिणामांचे परीक्षण करणार आहे. तो पृथ्वीपासून ६३६ किमी उंचीवर स्थिर करण्यात आला आहे. या उपग्रहाकडून मिळणारी माहिती सूर्यापासून येणाऱ्या इन्फ्रारेड किरणांचा आणि त्यांच्या विद्युत चुंबकीय लहरींचा पृथीवरील शेती, जलसाठे आणि जंगलांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे वातावरणातील बदलाचे निश्चित कारण शोधण्यासाठी संशोधकांना मदत होणार आहे.




























































