
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांची सोमवारी आयकर खात्याने जवळपास 9 तास चौकशी केली. बेनामी संपत्ती प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. चौकशीसाठी त्यांना याआधीच समन्स बजावण्यात आला होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्यांनी आणखी वेळ मागितला होता.
सोमवारच्या चौकशीनंतर त्यांनी स्वतŠवरील आरोपांचे खंडन केले. मी कुठलीही करचुकवेगिरी केलेली नाही. तपास अधिकाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे. न्याय व सत्याचा विजय होईल. माझ्याकडे लपवण्यासारखे आणि चिंता करण्यासारखे काहीही नाही, असे ते म्हणाले.


























































