यूट्यूबवरून शॉर्टस् पूर्ण हटवता येणार, रील्सचे व्यसन सोडवणे होणार सोपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूट्यूबने ‘टाइम मॅनेजमेंट’चे नवीन फीचर जारी केले आहे. याच्या मदतीने आता अ‍ॅपवर शॉर्टस् पाहण्याची वेळमर्यादा ‘शून्य’वर सेट करू शकता. यामुळे शॉर्टस् फीड पूर्णपणे काढून टाकली जाईल. रील्सचे व्यसन सोडवण्यासाठी या फीचरची मदत होईल. यूट्यूबने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शॉर्टस्साठी टाइमर फीचर सादर केले होते, ज्यामध्ये वेळ मर्यादा 15 मिनिटे होती. जानेवारीमध्ये या फीचरचा विस्तार करत पालकांना मुलांच्या स्क्रीन टाइमसाठी ‘शून्य मिनीट’ पर्याय देण्यात आला आहे.