
हिंदुस्थानी वंशाचे लोक परदेशातील मोठमोठय़ा कंपन्यांच्या सीईओ पदावर विराजमान झाले आहेत. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यानंतर आणखी एक नाव चर्चेत आले आहे. जगदीप सिंह असे त्यांचे नाव असून त्यांना बॅटरी बनवणाऱ्या एका स्पार्टअप कंपनीने वार्षिक 17,500 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. जगदीप सिंह त्यांच्या पॅकेजमुळे चर्चेत आले आहेत. कारण त्यांचे पॅकेज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलन मस्कला टक्कर देणारे आहे.
जगदीप सिंह यांना अमेरिकन स्टार्टअप कंपनी क्वांटम स्पेसने वजनदार पॅकेज दिले आहे. जगदीप सिंह यांनी स्टॅनपर्ह्ड युनिव्हर्सिटीतून कॉम्प्युटर सायन्समधून बीटेक केले आहे. त्यासोबत युनिव्हर्सिटी ऑफ पॅलिपहर्निया येथून एमबीए तर युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅण्ड कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे.
कंपनीच्या शेअर होल्डर्सच्या वार्षिक बैठकीत जगदीप सिंह यांना इतके पॅकेज देण्याला मंजुरी देण्यात आली. ते जगदीप सिंह क्वाटंमस्पेस कॉर्प पंपनीचे संस्थापकही आहेत. यापूर्वी ते इन्फिनेरा कंपनीचे सीईओ होते.






















































