अत्याचाराच्या घटनांमध्ये 95 टक्के वेळा चूक मुलींचीच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सीकर

देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत 95 टक्के प्रकारात चूक मुलींचीच असते असे संतापजनक वक्तव्य जैनमुनी विश्रांती सागर यांनी राजस्थानातील सीकर येथे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. महिला अत्याचाराच्या वाढत्या प्रकारांवर भाष्य करताना विश्रांत सागर यांनी मुलींचा उल्लेख वस्तू असा करीत त्यांनी संयमाने वागण्याची गरज असल्याचाही खळबळजनक दावा केला. जैन मुनींच्या या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजस्थानमधील सीकर जिह्यातील पत्रकार परिषदेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर जैन मुनी बोलत होते.

मुलींनीच सावधपणे वागावे!
आजच्या युगात मुलींनीच सावधपणे वागण्याची गरज आहे. कारण मुलींना आपले सासर आणि माहेर असा दोन्हीकडच्या मान राखायचा असतो. तरुणींनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली न जाता संस्काराचे शिक्षण घ्यावे असा अनाहूत सल्लाही जैन मुनी विश्रांती सागर यांनी मुली आणि महिलांना दिला.