मोदींकडून RSS चे कौतुक म्हणजे 75व्या वाढदिवसापूर्वी संघाला खुश करण्याचा हतबल प्रयत्न, काँग्रेसची खरमरीत टीका

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. त्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

जयराम रमेश यांनी ट्विटरवरून एक भलीमोठी पोस्ट करत मोदींवर निशाणा साधला. मोदींच्या भाषणातील विविध मुद्द्यांवर प्रतिक्रीया देत रमेश यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. यात मोदींना लाल किल्ल्यावरून संघाच्या केलेल्या कौतुकाबाबत बोलताना जयराम रमेश म्हणाले की, लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेणं हे संविधानाचे, धर्मनिरपेक्ष देशाच्या भावनांचे खुले उल्लंघन आहे. पुढच्या महिन्यात मोदींचा 75 वा वाढदिवस आहे. त्याआधी संघाला खुष करण्याचा हा एक प्रयत्न आहे. 4 जून 2024 च्या घटनेनंतर निर्णयाक पद्धतीत पंतप्रधान कमजोर पडले आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ वाढावा यासाठी आता ते पूर्णपणे मोहन भागवत यांच्यावर निर्भर आहेत. स्वातंत्र्यदिनासारख्या देशस्तरीय कार्यक्रमात व्यक्तिगत आणि संघटनेच्या लाभासाठी राजनिती करणे हे लोकशाहीच्या मूल्यांसाठी घातक आहे. आज पंतप्रधान थकलेले दिसले. लवकरच ते निवृत्त होतील’, असे जयराम रमेश म्हणाले.