
सामना ऑनलाईन । परळी वैजनाथ
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू आहे. बीडच्या परळी तालुक्यातील रामेवाडी येथील युवकांनी फडणवीस सरकारला आरक्षण देण्याची सुबुद्धी द्यावी, असं साकडं घालत मारुती मंदिरामध्ये जलाभिषेक आंदोलन केलं आहे. परळीसह राज्यभरात गेल्या १९ दिवसांपासून आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. तरीदेखील सरकारला पाझर फुटत नसल्याचा आरोप करत गावातील सर्व तरुण युवकांनी मारुतीच्या मूर्तीला अभिषेक करत अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले आहे.
रामेवाडी येथील शिवक्रांती युवा संघटनेचे तालुका प्रमुख जगमीत्र पौळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन केले



























































