जालन्यात सोशल डिस्टंन्सिगचे तीन तेरा, बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीड ते दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आज २२ मे पासून जालना शहरातील व ग्रामीण भागातील बाजारपेठ, दुकाने खरेदीसाठी खुली करण्यात आली. या सर्व दुकानांमध्ये पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे नागरिकांनी तीन तेरा वाजवले आहेत.

जालना जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिव वाढतच चालले असून आज पर्यंत कोरोना रुग्णांचे अर्ध शतक पार केले आहे. तरीही आज शुक्रवारी जालना शहरातील बाजारपेठेत भाजीपाला, किराणा सामान इतर खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबडच उडाली आहे. दोन महिन्यांपासून रस्त्याने अत्यावश्यक वाहने सोडून कोणतेच वाहने धावत नव्हते. त्यामुळे रहदारीसह प्रदुषण थांबण्यास मोठी मदत झाली व कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा रोखण्यासह ही जिल्हा प्रशासनास यश आले होते. परंतु मागील काही दिवसांपासून सर्वच गोष्टींना मुभा दिल्याने नागरिक खुलेआम मोक्याच्या ठिकाणांसह बाजारपेठेत गर्दी करु लागले. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास नक्कीच जालनेकरांनासाठी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी धोकादायक ठरु शकते.