जालन्यात विशेष मोहीमेअंतर्गत तीन ठिकाणच्या हातभट्टयांवर छापा, दोन लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातील कैकाडी मोहल्ला व नुतनवसाहत भागात खुलेआम चालू असलेल्या अवैध दारुच्या हातभट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी छापे टाकून हातभट्ट्या उद्वस्त केल्या आहेत. यात दोन लाख 16 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालना शहरातील विशेष मोहीम राबवून महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे अवैध दारूविक्री व तयार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक रागसुधा. आर यांनी सुचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी वेगवेगळे पथके तयार करून कैकाडी मोहल्ला व नुतनवसाहत भागातील गावठी हातभट्टी तयार करून विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना 25 मे रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कैकाडी मोहल्ला व नुतनवसाहत भागात काही महिला गावठी हातभट्टया लावून दारुची चोरटी विक्री करीत आहेत, अशी माहिती मिळाली होती.

पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कैकाडी मोहल्ला व नुतनवसाहत भागात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापा मारला असता कैकाडी मोहल्ला येथे दोन महीला व तवसाहत येथे एक महिला या मिळून आल्या. सदर तीन महिला यांच्या घराची पाहणी केली असता घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत गावठी हातमट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टी लावून हातभट्टीची दारु तयार करतांना रसायन व दारूसह चोरटी विक्री करतांना मिळून आले. या तीन महिला यांच्याकडुन 2 लाख 16 हजार 500 रुपयाचे रसायन, प्लॉस्टिक व लोखंडी ड्रम, कॅन,चालु हातपट्टया व गावठी हातभट्टी दारु असा मुद्देमाल जप्त फरुन नाश करण्यात आला आहे. महिला आरोपींविरोधात कदीम जालना ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे (03) गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक रागसुधा.आर, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोडले, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोकुळसिंग कायटे, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रुस्तुम जेवाळ, फुलचंद गव्हाणे, देवीदास भोजने, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, रंजीत वैराळ, किशोर पुंगळे, भागवत खरात,कैलास चेके, योगेश सहाणे, सचिन राऊत, संजय सोनवणे, चालक सुरज साठे, महिला अंमलदार चंद्रकला शडमल्लू, रेणुका बाडे, गोदावरी सरोदे यांनी केली आहे.