
जळगाव जिल्ह्यातील एरंडेल तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. वरखेडी येथे शेतात झोपलेल्या मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक चिमुकली बचावली.
मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचे काम करणारे पावरा कुटुंब एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील एका शेतात मुक्कामाला थांबले होते. या शेताला घालण्यात आलेल्या कुंपणात विजेचा प्रवाह उतरला आणि विजेचा धक्का बसून पावरा कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखले झाले आहे. मृतांमध्ये आई, मुलगा, सुन आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर एक वर्षांची चिमुकली वाचली आहे. हे कुटुंब कुठले आहे याची ओळख पटविली जात असून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, तहसीलदार प्रदिप पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीकारी घटनास्थळी दाखल झाले असून, याबाबत अधिक तपास सुरु केला आहे.