
जालना जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पक्षप्रवेशासाठी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रिघ लावली आहे. आज बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार सर्कल मधील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी जालना जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर व माजी आमदार संतोष सांबरे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, माजी जि.प. सदस्य कैलास चव्हाण, श्रीराम कान्हेरे, युवासेनेचे जिल्हा समन्वयक भरत सांबरे, अंकुश पाचफुले,माजी जि.प. सदस्य गणेश डोळस, वैजनाथ सिरसाट, संतोष नागवे, गजानन लहाने, कलीम शेख, अर्जुन चव्हाण, लक्ष्मण कान्हेरे व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है…. शिवसेना झिंदाबाद… जय भवानी जय शिवाजीच्या घोषणानी परिसर दणाणला होता.


























































