जालना जिल्ह्यात 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 148 जणांचे निगेटिव्ह

505

जालना जिल्ह्यात आज 14 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी आणखी 39 संशयित रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आले असून 149 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. या 39 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता 1248 इतकी झाली असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या 39 रुग्णांमध्ये सर्वाधिक 7 रुग्ण हे जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथील असून याच तालुक्यातील वरुड बु येथील 3, धाकलगाव येथील 4, परतूर तालुक्यातील आष्टी येथील 6, परतूर शहरातील सराफा बाजार 4, काझी गल्लीतील 1, जयभवानी कॉलनीतील 2, घनसावंगी येथील 3, कंडारी अंबड येथील 2 तसेच भोकरदन, माहेर जवळा, वाकुळणी, लक्ष्मीकांत नगर इंडेवाडी, चिखली, धनगर गल्ली जाफराबाद आणि देवपिंपळगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

गुरुवार पर्यंत 2067 रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी 39 रूग्णांची वाढ झाल्याने आता उपचार सुरू असलेल्या एकूण रूग्णांची संख्या 1248 इतकी झाल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या