व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या तीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

जालना शहरातील व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून आरोपीच्या ताब्यातून 3 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर रोजी जुना जालना भागातील शिवशक्ती दालमिल समोरील रोडवर जालना शहरातील व्यापारी खेराजभाई भानुशाली यांच्या सुटकेसाठी त्यांचा मुलगा दिपक भानुशाली यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी अज्ञात खंडणीखोरांनी फोनवरून केली होती. सदर रक्कम सेंट मेरी स्कुल, जालना जवळ अपहरणकर्त्यांनी सांगितली होती. दिपक भानुशाली यांनी सदर माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी पथकासह सेंट मेरी स्कुल येथे सापळा रचला. मध्यरात्री सापळा रचून अपहरण झालेले ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांची शिताफीने अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून रात्री 12.30 वाजता सुखरुप सुटका केली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली.