गावठी पिस्तूल बाळगणारा महाविद्यालयीन विद्यार्थी जेरबंद!

493

जालना येथील एका महाविद्यालयीन तरुणाला गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्याला एडीएसच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी तरुणाने त्याच्याकडील पिस्तूलाचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, महाविद्यालयीन तरुणाकडे गावठी पिस्तूल असून ती घेवून तो संभाजीनगरहून बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथे बसने जात आहे. त्यावरुन एडीएसच्या पथकाने सापळा रचला असता आरोपी तरुण बदनापूर येथे खाटीक गल्ली जवळून वाल्हा रोडने पायी जात असताना दिसला. पोलिसांनी त्याच्यावर झडप मारुन त्याच्या पॅन्टच्या खिशातून गावठी पिस्तूल मॅगझीनसह 40 हजार रुपये मिळाले. आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच पिस्तूल मित्राची असून त्याला देण्यासाठी मी जात होतो, असे उत्तर मिळाले. मात्र त्याच्या मित्राचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. या वरुन पोहेकॉ ज्ञानदेव नागरे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द कायदेशिर फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या