जालन्यात मोटार सायकल चोराच्या मुसक्या आवळल्या, अडीच लाखांचा मोटार सायकली जप्त

जालना शहरातील कदीम जालना पोलिसांनी एका मोटार सायकल चोराच्या मुसक्या आवळून त्याच्या ताब्यातून 2 लाख 11 हजार रुपये किमतीच्या 4 मोटार सायकली जप्त केल्या आहे. ही कारवाई 19 जानेवारी रोजी जालन्यात करण्यात आली.

जालना शहरामध्ये मोटार सायकल चोरीचे वाढते प्रमाण पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी जालना उपविभागातील पोलीस ठाण्यातील सर्व डी.बी. पथकांना मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

त्यावरुन कदीम जालना पोलीस ठाणे येथील डी.बी. पथकांनी मोटार सायकल चोराचे शोध मोहीम सुरू केली असता त्यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी कुलदीप उर्फ जज्जा अंबादास जगधने (रा. जमुनानगर, जुना जालना) यास ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली. तेव्हा त्याने कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 20 ते 22 दिवसा अगोदर मोटार सायकली चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील चोरी केलेल्या चार मोटार सायकल जप्त केल्या आहे.

एक हिरो होन्डा, हिरो पॅशन, 2 स्कुटी आरोपीच्या ताब्यातून असा 2 लाख 11 हजार रुपयांचा मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. आरोपीने अजून काही –गाड्या चोरी केल्या आहेत काय, या बाबत अधिक तपास सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व डी.बी. पथकाचे कर्मचारी मनोज हिवाळे, संतोष अंभोरे, किरण चेके, बाबा गायकवाड, रामेश्वर राऊत, कैलास चेके, रामलाल कांगणे, विठ्ठल खार्डे असे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या