कश्मीर आमचा होता, आहे व राहील; जमीयत उलेमा-ए-हिंदची पाकला चपराक

1759


जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल झाल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच आकांडतांडव सुरू आहे. या मुद्द्याला हिंदू, मुस्लीम असे धार्मिक रुप देण्याचा पाकड्यांचा विखारी प्रयत्न आहे. परंतु या प्रयत्नाला हिंदुस्थानमधील देशप्रेमी मुस्लीम भीक घालणार नाही हे गुरुवारी जमीयत उलेमा-ए-हिंदने (Jamiat-Ulema-e-Hind) केलेल्या विधानावरून दिसून आले. हिंदुस्थानातील मुस्लीमांची सर्वात मोठी संस्था जमीयत उलेमा-ए-हिंदने जम्मू-कश्मीर हिंदुस्थानचे अविभाज्य अंग असल्याचे म्हणत पाकड्यांना चपराक दिली आहे.

आमच्यावर कोणीच भरवसा ठेवत नाही, पाकिस्तानी मंत्र्याने बोलून दाखवले दु:ख

जमीयत उलेमा-ए-हिंदची दिल्लीमध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये तीन हजार सदस्य सहभागी झाले होते. यात जम्मू-कश्मीर हिंदुस्थानचे अविभाज्य भाग असून सर्व कश्मीरी आमचे भाऊबंद असल्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच हुर्रियत आणि फुटिरतावादी आंदोलन जम्मू-कश्मीरच नाही तर देशासाठीच नुकसानदायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दिल्लीतील बैठकीनंतर जमीयत उलेमा-ए-हिंदचे महमूद मदानी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जम्मू-कश्मीर आमचे होते, आहे आणि राहील. जम्मू-कश्मीर हिंदुस्थानचे अविभाज्य अंग आहे. जिथे हिंदुस्थान आहे तिथे आम्हीही आहोत. ते पुढे म्हणाले की, जम्मू-कश्मीरमधील लोकांना लोकशाहीने दिलेल्या आणि मानवीय अधिकारांचे रक्षण करणे आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. तसेच त्यांचे (कश्मीरी नागरिक) हिंदुस्थानशी एकरूप होणे त्यांच्यासाठी कल्याणकारी आहे, कारण शत्रूराष्ट्र आणि शेजारील देश (पाकिस्तान, चीन) कश्मीरची वाताहत करत आहे, असेही मत महमूद यांनी व्यक्त केले.

एनआरसीला समर्थन
दिल्लीतील बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरसह एनआरसीच्या मुद्द्यावरही प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आसाममध्ये एनआरसी करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जमीयत उलेमा-ए-हिंदने समर्थन दिले आहे. देशभरामध्ये एनआरसी लागू करून घुसखोरांना बाहेर हाकलून देण्यात यावे आणि यावरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहनही जमीयत उलेमा-ए-हिंदने केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या