जामखेडमधील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जामखेड

शहरातील अनेक वर्षांपासून असलेले नगरपरिषदेच्या हद्दीतील अतिक्रमणे हटवून प्रशासनाने घटस्थापनेच्या दिवशी सीमोल्लंघनाला सुरुवात केली आहे, असे तहसीलदार आणि प्रभारी मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांनी सांगितले. तपनेश्वर रस्त्यावरील २६ पक्या बांधकामापैकी पंचवीस पक्के अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. तर संतोष पवार यांच्या बांधकामाचे गुरुवारी भुमी अभिलेख अधिकार्‍यांकडून मोजणी करून हटविण्यात येईल. बुधवारी चार पोलीस अधिकारी ७० पोलीस कर्मचारी नगरपरिषदेचे १२० कर्मचारी, ३ जेसीबी, दोन टॅक्ट्रर यांच्या सहकार्याने ही अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.
भाजी बाजारातील मच्छी बाजारातील सुमारे १५ टपऱ्या, भुतवडा रोडवरील अतिक्रमित ओटे, पत्रा शेड अशी अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. गुरुवारीही ही मोहीम सुरूच राहील. नगरपरिषदेच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत आता बांधकाम विभागाचे अतिक्रमणे कधी हटवणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.