
जामखेड शहरातील संताजीनगर परिसरातील इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या साक्षी बाबासाहेब भालसिंग ( वय 18) या विद्यार्थीनीने राहत्या घरात सकाळी साडेनऊच्या आसपास फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ती एकुलती एक होती.
साक्षी ही बारावी मध्ये नगरमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. पण सध्या वसतीगृह बंद असल्याने ती घरीच ऑनलाईन अभ्यास करत होती. सकाळी साडेनऊ वाजता राहत्या घरात साडीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही पण आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी असे नातेवाईकांनी सांगितले पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल बापू गव्हाणे हे करत आहेत.





























































