उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद

जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपचा एक जवान शहीद झाला. त्यानंतर सुरक्षा जवान आणि पोलिसांनी दहशतवाद्यांना चारही बाजूने घेरले असून शोधमोहिम वेगाने सुरु केली आहे.

उधमपूरमधील सोन माजलता येथे सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत पोलिस कर्मचारी शहीद झाले असून एक दहशतवादी जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोळीबार थांबला असून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे आणि लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर तपास करत आहेत.