
पुँछ जिह्यात घाटातून जात असताना खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 1 जवानासह 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 44 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. घनी गावातून मेंदर येथे जात असताना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वाहनचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऩयांनी दिली.