जम्मू कश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, तीन दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात लष्कराने मोठी कारवाई करत लष्कर ए तोयबाच्या तीन दहशताद्यांना अटक केली आहे. आशिक हुसैन हाजम गुलाम, मोही दीन डार आणि ताहिर बिन अहमद अशी त्या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत.

बंडागम मधील खेरेया गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून लष्कराला मिळाली होती. त्यानंतर 53 राष्ट्रीय रायफल्स व केंद्रीय राखीव पोलीस दलाचच्या जवानांनी कारवाई करत दहशतवाद्यांना अटक केली व लष्कर ए तोयबाच्या मोड्यूलचा भांडाफोड केला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात एक चीनी पिस्तूल, दोन काडतूसं, 22 हिंदुस्थानी बनावटीच्या बंदूका, एक मॅगझिन, एके 57 रायफल व स्फोटकांचं सामन तसेच एक बाईक जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेली दहशतवादी हे स्फोटकांची ने आण करणे, स्फोटकं बनवणे या कामात सहभागी असल्याचे समजते. लष्कर ए तोयबाकडून त्यांना आर्थिक रसद पुरवली जात होती.