
जम्मू-कश्मीरच्या किश्तवाडमधील चासोटी गावात ढगफुटी आणि भूस्खलन होऊन अक्षरशः हाहाकार उडाला. मृत्यूने थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीतील मृतांचा आकडा तब्बल 65वर गेला आहे. यातील 21 मृतांची ओळख पटली असून आतापर्यंत 167 जणांना वाचवण्यात आले आहे. तर 38 जणांची प्रपृती चिंताजनक आहे. दरम्यान, आणखी 500 जण दगड, चिखल-मातीच्या लोंढय़ाखाली अडकल्याची भीती जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.
माचौल माता यात्रेसाठी किश्तवाडमधील चासोटी गावात हजारो भाविक पोहोचले तेव्हा ही नैसर्गिक आपत्ती ओढवली. यात्रा जिथून सुरू होणार होती तिथेच ढगफुटी आणि भूस्खलन झाले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. एनडीआरएफची पथके बचावकार्य करत आहेत. 60-60 सैनिकांची पाच पथके असे एपूण 60 सैनिक, व्हाईट नाईट कॉर्प्सचे वैद्यकीय पछक, जम्मू आणि कश्मीर पोलीस, एसडीआरएफ आणि इतर एजन्सी या ऑपरेशनमध्ये गुंतले आहेत.
मृतदेहांची फुप्फुसे चिखलाने भरली
ढिगाऱयाखालून काढण्यात आलेल्या मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक होती. मृतांची फुप्फुसे अक्षरशः चिखलाने भरलेली होती. मृतदेहांचे अवयव विखुरलेले होते. कित्येक तास शोधमोहीम राबवल्यानंतर स्थानिक लोक, लष्करी कर्मचारी आणि पोलिसांनी चिखलातून जखमींना बाहेर काढले आणि ताबडतोब रुग्णालयात दाखल केले.
100 ते 150 जण वाहून गेले
ढगफुटी आणि भूस्खलनाचा भयावह अनुभव लोकांनी सांगितला. मंदिराजवळ भंडारा सुरू होता. प्रचंड गर्दी होती. दुकाने लागलेली होती. हे सगळे पाणी आणि मातीच्या ढिगाऱयासोबत वाहून गेले… अनेक जण ढिगाऱयाखाली दबले गेले. एक इमारत जमीनदोस्त झाली. तिच्या ढिगाऱयाखालून लोकांनीच मृतदेह बाहेर काढले. अजूनही अनेक जण ढिगाऱयाखाली दबलेले आहेत. ओढय़ाजवळ 100 ते 150 जण होते. ते सगळे पुरात वाहून गेले. आम्ही लोकांना आवाज दिला, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही, असे हसन या स्थानिक नागरिकाने सांगितले. दरम्यान, माझी बहीण, वहिनी आणि तिचे पुटुंब आम्ही सगळे वाचले. माझा छोटा मुलगा नाल्याच्या दिशेने पळाला आणि ढिगाऱयात अडकला. त्याला बाहेर काढले, असा थरारक अनुभव एका महिलेने सांगितला.